भाजपा कणकवली शहर मंडलच्या वतीने महात्मा गांधी जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडलच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सामाजिक एकतेचा संदेश देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या विचारांचे स्मरण करत समाजात स्वच्छता, शांतता आणि बंधुभावाची भावना रुजविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाला भाजपा कणकवली शहर मंडलचे मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, संदीप सावंत, सदा चव्हाण, अमोल रासम, मिथुन ठाणेकर, पप्पू पुजारे, प्रशांत राणे, सागर राणे, नयन दळवी, प्रसाद देसाई, बाळा मेस्त्री, रोहित ठाकूर, मनी, ओम देसाई, मंदार सोगम, स्वप्निल वर्दम, संतोष चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करत त्यांच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेच्या संदेशाचा समाजात प्रसार करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!