कार – दुचाकीच्या अपघातात युवक ठार, एक जखमी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नानेली घाडीवाडी येथील एक युवक ठार झाला आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय समोर मुंबई-गोवा महामार्गावर घडला. दुचाकीला एसक्रॉस गाडीची धडक बसल्याने हा अपघात घडला. गाडीच्या मागे बसलेला रोहित रामचंद्र कळसुलकर (वय २१) हा जागीच मृत्यू झाला तर चालक उत्तम उदय नेवगी (वय २४) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोघेही युवक सावंतवाडी माणगावच्या दिशेने जात होते कोलगाव आयटीआय समोर आले असता त्यांची आलिशान कारला धडक बसली. या धडकेत रोहित हा रस्त्यावर आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला. त्यानंतर त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रोहित हा माणगाव येथील एका बॅन्जो पार्टी वादक म्हणून काम करत होता आणि मिळेल त्या वेळी तो वेल्डिंग काम करत असे. तो सावंतवाडीत एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, त्याचे वडील मिळेल ते काम करीत होते. त्याच्या पक्षात एक भाऊ, आई, वडील असा परिवार आहे. तर उत्तम मुबई येथे कामानिमित्त होता. तो काही कामासाठी गावात आला होता. आज तो संध्याकाळी मुंबईत जाण्यासाठी निघणार होता मात्र त्याला सुदेवाने मोठी दुखापत झाली नाही. याबाबतची माहिती मिळतात माणगाव नाणेली आकेरी येथील ग्रामस्थ आणि त्यांचा मित्रपरिवार यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.

error: Content is protected !!