मोगरणेत विहिरीत पडला गवा रेडा

फॉरेस्ट रेंजर अमृत शिंदे, अमित कटके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सुखरूप सुटका

मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील मोगरणे गावातील विहिरीत आज सकाळी गवा रेडा पडल्याची माहिती वनविभागाला समजली. त्यानंतर उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी जात अथक मेहनत घेत गवा रेड्याची सुखरूप सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. गवा रेड्याच्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये कडावल वनपाल सुरेश मेत्तर, मालवण वनपाल श्रीकृष्ण परिट वनरक्षक संजीव जाधव, विष्णू नरळे, वनमजुर अनिल परब यांनी अथक मेहनत घेतली.

error: Content is protected !!