राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी…

कणकवली (प्रतिनिधी) : दिनांक 2 /10 /2026 रोजी काँग्रेस तालुका कार्यालय कणकवली येते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रमुख पदी राजेंद्र कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे ,त्याबद्दल त्यांचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आहे . तसेच काँग्रेसच्या पुढील वाटचालीबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर ,शहराध्यक्ष अजय मोरयै ,जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरूनकर ,नागेश मोयै, महेश तेली, प्रदीप कुमार जाधव, राजेंद्र कदम, वि.के. सावंत, लॉरेन्स डिसूजा, आयेशा सय्यद, राजू वणॆ, संजय राणे, निलेश मालडंकर व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!