भाजपा महिला मोर्चा वतीने आंगण का मिलन उपक्रम

जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांनी केला अंगणवाडी सेविका, मदतनीसांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने आयोजित सुरु असलेल्या आंगण का मिलन या उपक्रमच्या माध्यमातून आज कलमठ येथे भाजपा महिला मोर्चा वतीने अंगणवाडी भेट देऊन अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा सत्कार करून, बालकांना फळ वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिला मोर्चा प्रत्येक अंगणवाडी पर्यंत जाऊन सेविका, मदतनीसांचा सत्कार करणार आहे. जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री बोलताना म्हणाले की अंगणवाडी म्हणजे अनेक पिढ्यांचे संस्कारांचे व्यासपीठ असून प्रत्येक आई आपल्या विश्वासावर आपले लेकरांना इथे बिनधास्त असतात याला कारण आपली मेहनत आणी प्रामाणिकपणा असतो. कमी मानधनातं काम करणारी सेविका आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाच्या माध्यमातून मानधन वाढ झाली, विमा दिलाहे सगळं आपल्या कष्टाचं फळ आहे म्हणून आपले ऋण व्यक्त करावेत यासाठी आम्ही महिला मोर्चा वतीने इथे आपला सन्मान करताना आम्हाला आनंद होत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्या स्वाती नारकर, नजराणा शेख गौरी साळकर , मुख्याध्यापक मधुरा सावंत, अंगणवाडी सेविका पूजा हुन्नरे, मनीषा पवार, मदतनीस शुभांगी सावंत, निकिता कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!