खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने श्रमदानातून बांधण्यात आले ३ बंधारे

महिला बचत गट अंगणवाडी सेविका व प्राथमिक शिक्षक यांचा सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात उद्भभवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी केलेल्या आहवानाला प्रतिसाद देत व प्रशासनाच्या सूचनेनुसार आज मंगळवार दि.६ ऑक्टोबर २०२६ रोजी खारेपाटण ग्रामपंचायत अंतर्गत महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस प्राथमिक शिक्षक यांच्या वतीने गावात एकूण ३ विविध ठिकाणी “पाणी आडवा पाणी जिरवा” या पार्श्वभूमीवर श्रमदानातून बंधारे बांधण्यात आले. या उपक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्या प्राची ईसवलकर, पं.स.सदस्य श्री गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच रमाकांत राऊत, ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, मनाली होणाळे, क्षितिजा धुमाळे, अस्ताली पवार, केंद्रप्रमुख सचिन जायभाय, ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, विजय सावंत, मंगेश ब्रम्हदंडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेदचे प्रकल्प अधिकारी अमोल गराडे तसेच महिला बचत गटाच्या सी टू सी आस्था पाटणकर, सी आर पी युती पोमेडकर, सायली तूरळकर,उर्मिला सुतार ग्रामसंघाच्या अध्यक्ष अलका पोटले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य,बचत गटातील महिला,प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांनी मिळून श्रमदानातून खारेपाटण हसोळटेंब कोंडवाडी अवेरा वाहळावर बंधारा बांधण्यात आला.तसेच खारेपाटण टाकेवाडी येथील वाहळावर देखील बंधारा बांधण्यात आला.सहभागी सर्व ग्रामस्थ कर्मचारी वर्ग यांना ग्रामपंचायत खारेपाटण च्या वतीने चहा नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

error: Content is protected !!