देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविणार गटविकास अधिकारी .

देवगड (प्रतिनिधी) :करिश्मा नायर जागतिक पातळीवर २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘ आम्ही कटिबद्ध आहोत ‘ ही या सप्ताहाची थिम असणार आहे . या दिनाचे औचित्य साधून २२ ते २८ मे या कालावधीत जिल्हाच्या मार्गदर्शनानुसार देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबवण्याबाबत नियोजण बैठक गटविकास अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. यावेळी देवगड तालुक्यातील मास्टर ट्रेनर उपस्थित होते .
मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबाबत असलेल्या अज्ञानापोटी निर्माण झालेल्या विविध रूढी परंपरांमुळे मुली -महिलांना मोठया प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते . स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन हा मासिक पाळी व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक आहे . या पार्श्वभुमीवर या दिनाचे औचित्य साधुन तालुक्यात रॅली , चर्चासत्रे , प्रशिक्षण, प्रबोधन उपक्रमांद्वारे जनजागृती सप्ताह तालुका व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड करिश्मा नायर यांनी माहिती दिली.

error: Content is protected !!