राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघाच्या वतीने महाळुंगे येथे वर्षावास कार्यक्रम संपन्न

“श्रवण, पालन व अनुकरणात मानवी जीवनाचे कल्याण” – सुधीर सकपाळ

खारेपाटण (प्रतिनिधी) : “भ.बुद्धांच्या विशुद्धी मार्गाचे शिलपालन हा मानवी जीवनाचा मापदंड असून श्रवण,पालन व अनुकरणातच मानवी जीवनाचे खरे कल्याण असल्याचे भावपूर्ण उदगार बौद्धचार्य सुधीर सकपाळ गुरुजी यांनी राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघ ग्रामीण शाखेच्या अंतर्गत गट क्र.७ च्या वतीने महाळुंगे ता. राजापूर येथील जेतवन बुद्धिवहारात आयोजित करण्यात आलेल्या वर्षावास कार्यक्रमात बौद्ध अनुयांना मार्गदर्शन करताना काढले.

राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघ गट क्र.७ चे अध्यक्ष उमाकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.११ ऑक्टोबर २०२६ रोजी महाळुंगे बौद्ध विकास मंडळ ग्रामीण / मुंबई व आम्रपाली महिला मंडळ महाळुंगे व गट क्र.७ यांच्या संयुक्त विद्यमाने “जेतवण बुद्धविहार” येथे संपन्न झालेल्या या ८ व्या वर्षावास प्रबोधन कार्यक्रमास राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघ मुंबई संघटनेचे अध्यक्ष प्रताप पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर ग्रामीण संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप तांबे, गट क्र.७ चे सचिव संतोष कांबळे, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, महाळुंगे बौद्ध विकास मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पवार सचिव – संजय पवार, आम्रपाली महिला मंडळाच्या अध्यक्ष विशाखा पवार, बौद्धचार्य महेंद्र पवार, चंद्रकांत पवार, स्वाती जाधव, संजय चाफे, विलास जाधव आदी मान्यवर यावेळीं उपस्थित होते.

प्रारंभी वर्षावास कार्यक्रमाची सुरवात त्रिसरण पंचशील सामुदायिक रित्या घेऊन करण्यात आली. यावेळी बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थी, कर्मचारी व सामाजिक योगदान देणाऱ्या कार्यकर्त्याचा राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रताप पवार यांच्या शुभहस्ते भ.गौतम बुद्धाचे विचार आलेले पुस्तक, पेन व पुष्यगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.

या सत्कारमध्ये डॉ.सुरज उमाकांत जाधव (कुंभवडे), आदर्श शिक्षक प्राचार्य नीलेश पवार, आदर्श शेतकरी रवींद्र पवार, प्राचार्य डॉ.सोनाली कांबळे, प्रदीप प्रकाश कदम, बँक ऑफ इंडिया मॅनेजर विक्रांत पवार, तंटामुक्ती समिती जूवाठी अध्यक्ष संतोष कांबळे, कु.स्मिथ निलेश पवार या गुणवंतांचा समावेश होता.

या वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने राजापूर तालुका बौद्धजन सेवा संघ मुंबई संघटनेचे अध्यक्ष प्रताप पवार यांनी भ.बुद्धांचे शिष्य अनाथ पिंड यांच्याविषयी धम्मप्रवाचन दिले. व बौद्ध धम्मात दानाला किती महत्त्व आहे हे विशद केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमकांत जाधव, संतोष पाटणकर, संजय चाफे, विक्रम पवार, स्वाती जाधव, विलास जाधव, चंदकांत पवार यांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गट क्र.७ चे सचिव संतोष कांबळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार महाळुंगे बौद्ध विकास मंडळाचे सचिव संजय पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला बौद्धजन सेवा संघ राजापूर गट क्र.७ मधील सर्व गावांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी सामुदायिक सरणातय घेऊन वर्षवास कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!