खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाघाची वाडी तळेरे या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व शालेय विद्यार्थी शिक्षक आणि महिला बचत गट यांच्या वतीने नुकताच दि.८ ऑक्टोंबर २०२६ रोजी तळेरे वाघाची वाडी येथील बायाचा ओहोळ येथे श्रमदानातून वनराई बांधण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदेश तांबे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मानसी भोगले, समिती सदस्य सावली भोगले, सपना चव्हाण, शोभा भोगले, वंदना चव्हाण, सुप्रिया चव्हाण, माजी विद्यार्थी कु.गार्गी चव्हाण, स्वरा भोगले आदी उपस्थित होते. संभाव्य होणाऱ्या दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी व शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हा बंधारा बांधण्याकरिता शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक व पालकांनी मेहनत घेतली. व श्रमदानातून बंधारा यशस्वी रीत्या पूर्ण केला.














