कोल्हापूर (प्रतिनिधी) : महालक्ष्मीर्यदा पूज्या महाकाली सरस्वती ।दक्षिणोत्तरयो: पूज्ये पृष्ठतो मिथुनत्रयम् ॥विरञ्चि: स्वरया मध्ये रुद्रो गौर्या च दक्षिणे ।वामे लक्ष्म्या हृषीकेश: पुरतो देवतात्रयम् ॥ — मराठी अर्थ —देवीमाहात्म्यअंतर्गत प्रधानिकरहस्यामध्ये सृष्टीक्रमाची माहिती मिळते. त्यानुसार सर्वस्याद्या महालक्ष्मी प्रथम आविर्भाव घेते, त्यानंतर ती तामसी महाकाली आणि सात्त्विकी महासरस्वती निर्माण करते. या तीनही देवता चतुर्भुज सांगितलेल्या आहेत. महालक्ष्मीने महाकाली आणि महासरस्वती यांना सृष्टीच्या उत्पत्तीसाठी पुरुष आणि स्त्री जोडप्यांची निर्मिती करण्याची आज्ञा दिली.
महालक्ष्मीने स्वत: एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुषाचे नाव ब्रह्मदेव आणि स्त्रीचे नाव लक्ष्मी असे ठेवले. महाकालीने एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुषाचे नाव शंकर आणि स्त्रीचे नाव सरस्वती असे ठेवले. महासरस्वतीने एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुषाचे नाव विष्णू आणि स्त्रीचे नाव उमा असे ठेवले. सृष्टीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी ब्रह्माला सरस्वती दिली, विष्णूला लक्ष्मी तर शंकराला उमा दिली.ही पूजाश्री. अजिंक्य मुनिश्वर,श्री. वेदांग मुनिश्वर,श्री. सोहम मुनिश्वर,व रवी माईनकर यांनी बांधली.












