शिवसेना आ. निलेश राणे यांनी कणकवलीत घेतले दुर्गा मातेचे दर्शन

भाजपच्यावतीने आ. निलेश राणे यांचा सत्कार ; दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी देवीचरणी घातले गाऱ्हाणे

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी कणकवली येथे भारतीय जनता पार्टी आयोजित नवरात्रौत्सवात दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आ. निलेश राणे यांचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणावर असलेले दुष्काळाचे सावट दूर होऊन शेतकरी, बागायतदार आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी त्यांनी दुर्गा मातेच्या चरणी गाऱ्हाणे घातले.

यावेळी भाजपा उपजिल्हाध्यक्ष गोट्या सावंत, पं. स सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू परुळेकर, संदीप सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख दामू सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे, स्वप्निल चिंदरकर, रामू विखाळे, सुशील पारकर, समर्थ कोरगावकर, लक्ष्मण घाडीगावकर, संतोष चव्हाण, अनुप वारंग, हनुमंत वाळके, समीर प्रभुगावकर, सागर राणे, राजन परब, ऋत्विज राणे, नितीन पवार आदींसह भाजप, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे संकट निर्माण झाले असून त्याचा परिणाम शेती, बागायती आणि ग्रामीण जनजीवनावर होत आहे. पावसाअभावी शेतकरी चिंतेत असताना या संकटातून जिल्ह्याची सुटका व्हावी, पुरेसा पाऊस पडून जलस्रोतांना मुबलक पाणी मिळावे आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने असलेल्या उपस्थित सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला, तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

error: Content is protected !!