आमदार निलेश राणे यांनी जयभवानी गोंधळी समाज संघाच्या नवरात्रोत्सवाला दिली सदिच्छा भेट

गोंधळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले उत्साहात स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : जयभवानी गोंधळी समाज संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवाला आमदार मा. निलेशजी राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जयभवानी गोंधळी समाज संघाचे अध्यक्ष मऱ्याप्पा इंगळे आणि उपाध्यक्ष शिवाजी भिसे यांनी आमदार निलेश राणे यांचे स्वागत केले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या भेटीदरम्यान आमदार निलेश राणे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच समाजातील एकोपा आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत करण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व अधोरेखित झाले.

यावेळी युवासेना तालुकाप्रमुख दामोदर सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख विजय इंगळे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अखिल भारतीय गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे, सचिव वैभव इंगळे, शिवाजी वाघमारे, प्रेम कासले, नागेश सूर्यवंशी, कृष्णा इंगळे, महेश कांबळे, विशाल इंगळे, राजू भिसे, अनिल इंगळे, शंकर वाघमारे, करण सूक्तेकर, रोशन इंगळे, वेदांत कांबळे, रोहित ननवरे, प्रथमेश इंगळे यांच्यासह जयभवानी गोंधळी समाज संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार निलेश राणे यांच्या सदिच्छा भेटीमुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली. यावेळी उपस्थितांनी त्यांचे स्वागत करत उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश दिला.

error: Content is protected !!