मंडळ कडून राबविले जाणाऱ्या समाजाभिमुख कार्यक्रमातून नवीन कुर्ली वसाहतीचा विकास हेच व्हिजन — प्रशांत दळवी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मधील निर्भीड पत्रकार आणि विविध उपक्रमात सामाजिक भान जपणारे, कुमार नाडकर्णी उभयतांचा नवदुर्गा युवा मंडळ,नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट यांच्यावतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ च्या निमित्ताने अरुण पिळणकर व राजेंद्र कोलते यांचे हस्ते, पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत,श्रीफळ — सन्मानचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रशांत दळवी यांनी मंडळाकडून राबविल्या जाणाऱ्या समाजाभिमुख आणि लोकोपयोगी कार्यक्रमातून, नवीन कुर्ली वसाहतीचा विकास हेच आमचे व्हिजन आहे. याकरिता पालकमंत्री नितेश राणे यांचे मार्गदर्शन, आणि लोकप्रिय जि. प. सदस्य मनोज रावराणे यांच्या सहकार्यांने विकास कामे सुरू आहेत. त्यातूनच चौथ्या स्तंभाचे कार्य नाडकर्णी करीत असतात. अरुण पिळणकर तसेच राजेंद्र कोलते यांनीही नवदुर्गा युवा मंडळातील कार्यकर्ते महिला, पुरुष यांच्या यथोचित सहकार्याचा गौरव केला.
नवरात्रोत्सव, ललिता पंचमी आणि आदिशक्ती महामायेच्या प्रत्यक्ष सानिध्यात, तिच्याच अंगणामध्ये माझ्या कामावर विश्वास दाखवून केलेला आम्हा उभयतांचा सन्मान, सदैव प्रेरणादायी ठरेल.असा विश्वास व्यक्त करून कुमार नाडकर्णी यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि वसाहतीतील महिला- पुरुष, नागरिकांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. आणि तुमच्या सर्व सकारात्मक कार्यात मी तुमच्या बरोबर असल्याचे अस्वस्थ केले. यावेळी अंकुश दळवी,मंगेश मडवी,नरेश शिंदे,अरुण पिळणकर, राजेंद्र कोलते,प्रशांत दळवी,प्रकाश आग्रे इ. उपस्थित होते.












