खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा रोवला आहे. हे सर्वच विद्यार्थी पुढील होणाऱ्या परीक्षेस पात्र झालेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने नुकतेच अभिनंदन करण्यात आले.
यामधील काही विद्यार्थ्यांना विशेष योग्यता म्हणून प्रथम श्रेणी प्राप्त झालेली आहे. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादित केलेले आहे.इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये कु. वैष्णवी महेंद्र गुरव, हिने १०० पैकी ९२ गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला असून कु प्राची संतोष घुळप, मारिया मुबिन पावसकर, सृष्टी श्रीपाद रानडे, कल्पक तेजस चौगुले, स्वरा राजेंद्र चिके आणि संस्कृती जयेश हरयाण, अन्वय देविदास कुमावत यांनी यश संपादन केले. तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये कु. आराध्या समीर पुराणिक हिने ९२ गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून कु दीक्षा किरण कर्ले, आयुषी रविंद्र गुरव, सीधा अब्दुलवहाब मुकादम, निधी कृष्णा बाणे, तायबा सरफराज ठाकूर, स्वरा प्रकाश पवार, मधुरा मंगेश ब्रह्मदंडे, दिवा इरफान ठाकूर, तेजस्वी रविंद्र पाचाळ या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, जिद्द, गणित विषयाची आवड आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शक शिक्षक सौ भोर, सौ अमृते, शिंदे सर, यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व विश्वस्त तसेच प्रशालेचे प्राचार्य संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.












