माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही – प्रदीप भालेकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या विद्यमान सदस्य प्राची ईसवलकर यांनी त्यांच्या नाहक बदनामी प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात माझ्या विरोधी लेखी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला असल्याचे सोशल मिडिया वेब न्यूज चॅनेलद्वारे खोटे व जनतेची दिशाभूल करणारे वृत्त प्रसिध्द केले होते.मात्र माझ्याविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात दाखलपात्र असा कोणताच गुन्हा नोंदवला गेला नसल्याचे आर टी आय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी सांगितले.

दरम्यान लोकप्रतिनिधींनी गोर गरीब जनतेचा पैसा हा त्यांच्या योग्य त्या विकास कामासाठी वापरला पाहिजे.मात्र त्या पैशाचा गैरवापर होऊन बोगस कामे करून आर्थिक भ्रष्टाचार करण्यात येत असेल तर आपण त्या विरोधात सातात्याने आवाज हा उठवतच राहणार असल्याचे देखील प्रदीप भालेकर यांनी सांगितले.याबाबत लवकरच आपण शासनाला यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे श्री भालेकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!