कणकवली (प्रतिनिधी) : पर्जन्यमान खूपच कमी झाल्यामुळे पाणी टंचाई भासू शकते. त्यामुळे भविष्यकाळ ओळखून से.नि.प्राथ.शिक्षक असोसिएशन व ग्रामपंचायत जानवली यांचे संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा जानवली येथे बांधला. यावेळी जानवली माजी सरपंच भगवान दळवी यांनी गाऱ्हाणे घालून व श्रीफळ वाढवून बंधारा बांधण्याचा शुभारंभ केला. यावेळी समाज सेवक पर्शुराम झगडे तसेच जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत तेली, तालुका अध्यक्ष शंकर बागवे, सचिव विजय मसुरकर तसेच जेष्ठ मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होते.
यावेळी जानवली ओहोळावर श्रमदानातून बंधारा बांधला. यावेळी गाव प्रतिनिधी व सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. बंधारा बांधताना उपस्थितांना नाष्टा व चहापान व्यवस्था जेष्ठ शिक्षक मनोहर दळवी यांनी केले. यावेळी समाज सेवक संदिप सावंत व ग्रा.पं.सदस्य नितीन राणे यांनी भेट दिली. शुभेच्छा दिल्या.
बंधारा बांधण्यात समाज सेवक पर्शुराम झगडे यांचे मोठे सहकार्य लाभले. पाणी अडवा, पाणी जिरवा, अंतर्गत बंधारा बांधल्याने पाणी संचय होण्यास मदत होईल. यावेळी आदरणीय प्रकाशभाई दळवी जिल्हा नेते यांनी शुभेच्छा दिल्या. विजय मसुरकर यांनी गीत गायन केले.
यावेळी जेष्ठ मान्यवर माळवदेसर, प्रभूसर, शंकर जाधव सर, अर्जुन राणे साहेब, अंजली राणे. तसेच क्रांती राणे इत्यादी सर्व शिक्षक उपस्थित होते.










