गोपुरीत २७ रोजी युवती मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र आणि गोपुरी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने २७ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत गोपुरी आश्रमाच्या बहुउद्देशीय सभागृहात युवती मेळावा २०२६ चे आयोजन केले आहे.

मेळाव्यामध्ये लिंगधारित समानता, शारीरिक व मानसिक आरोग्य, सुरक्षित स्त्री सक्षम समाज या विषयांवर मार्गदर्शन सत्रे आयोजित केलेली आहेत. या सत्रांना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नयना पावसकर, रूपाली कदम उपस्थित असतील. युवतींच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी, त्यांच्यातील नेतृत्वाला संधी देण्यासाठी, आपले प्रश्न आपले नेतृत्व या उद्दिष्टासाठी युवतींना या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनुभव शिक्षा केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

error: Content is protected !!