निमगाव नवरात्रौत्सव मंडळाचा सामाजिक उपक्रम – छात्रालयातील मुलांना जीवनावश्यक मदत

बांदा (मंगल कामत) : सार्वजनिक नवरात्रौत्सव सांस्कृतिक व कला क्रीडा मंडळ, निमजगा (बांदा) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. मंडळाच्या वतीने दयासागर छात्रालय, रोणापाल येथे शिकणाऱ्या गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्राम कानसे उपाध्यक्ष साई सावंत सर्वेश नाईक गजानन नाईक मंदार केसरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी छात्रालयाती व्यवस्थापक जीवाबा वीर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व संस्थेची माहिती देऊन छात्रालयातील व्यवस्थेची माहिती दीली. नवरात्रौत्सव म्हणजे केवळ देवीची आराधना नव्हे, तर समाजसेवेचाही उत्सव आहे, या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष *साई सावंत यांनी सांगितले.
या मदतीबद्दल छात्रालय परिवाराच्या वतीने मंडळाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.

error: Content is protected !!