जाज्वल्य देशाभिमानाचे चेतविले स्फुल्लिंग
न्यू इंग्लिश स्कुल आणि कॉलेज माजी विद्यार्थी संघाचे आयोजन
फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल जुनियर व सीनियर कॉलेज, फोंडाघाट यांच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘संपूर्ण वंदे मातरम’ या विशेष गीत गायन सोहळ्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) फोंडाघाट येथे अत्यंत उत्साहात आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात करण्यात आले. राष्ट्रीय गीताचा व त्याच्या ऐतिहासिक वारशाचा गौरव करणारा हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेचे प्राचार्य बी. पी. सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी माननीय दिलीप पारकर, माजी विद्यार्थी संघाचे प्रतिनिधी व सदस्य ईश्वरदास पावसकर, विजय नांदोस्कर तसेच माजी विद्यार्थी ओमकार राणे हे आवर्जून उपस्थित होते. राष्ट्रभक्तीच्या या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन त्यांनी विद्याथ्यर्थ्यांना मोलाचे प्रोत्साहन दिले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संस्थेचे निदेशक अभिषेक जोशी यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम’ या राष्ट्रीय गीताचा ऐतिहासिक संदर्भ, त्याचे महत्त्व आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील त्याचे अनन्यसाधारण स्थान याविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आणि माजी विद्यार्थी संघाचे सेक्रेटरी माननीय दिलीप पारकर यांनी विद्याथ्यांना ‘वंदे मातरम’ गीताची पार्श्वभूमी अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी पद्धतीने उलगडून सांगितली. यानंतर मान्यवरांचे आभार प्रदर्शन विजय नांदोस्कर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
या सोहळ्यास संस्थेचे निदेशक भास्कर पाटील, सतीश मेस्त्री, स्वप्नील विश्वांभरे, गणेश मराठे, अभिषेक जोशी आणि सायली तळवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय व कर्मचारी वर्गातून कनिष्ठ लिपिक एल. जी. असोलकर, आयएमसी क्लार्क मयुरेश पराडकर, भंडारपाल राहुल पाटील, चतुर्थ श्रेणी कर्मचारी एस. एस. आचरेकर आणि रामचंद्र इस्वलकर यांच्यासह संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्साहपूर्ण सामूहिक गायन कार्यक्रमाचा मार्गदर्शनानंतर मुख्य सोहळा पार पडला. यामध्ये अध्यक्ष, उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व प्रशिक्षणार्थी-विद्याथ्यांनी एकत्र येऊन अत्यंत तन्मयतेने आणि तालासुरात संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीत सामूहिकरीत्या गायले. सर्वांच्या एकत्रित स्वराने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणात दुमदुमून गेला. ‘वंदे मातरम’च्या जयघोषात या विशेष सोहळ्याची सांगता झाली.












