कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली कॉलेज, कणकवली येथे मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन ‘कोकण झोन – ०४ बॉल बॅडमिंटन स्पर्धा’ नुकतीच अत्यंत उत्साहात पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे सर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. डॉ.सोमनाथ कदम,जिमखाना विभाग प्रमुख प्रा. हेमंत गावित, प्रा. रामचंद्र कदम व मंगेश सपकाळ (कोकण झोन ०४ सदस्य) यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेत मुलांचे ४ आणि मुलींचे ४ असे एकूण ८ संघ सहभागी झाले होते. या संपूर्ण स्पर्धेत जवळपास ६४ खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेसाठी पंच म्हणून मंदार परब, कु. सुजाता हर्णे आणि कु.सायली वाघाटे यांनी जबाबदारी पार पाडली. या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटातडी. बी.जे.कॉलेज, चिपळूण प्रथम क्रमांक मिळवला व गोगटे जोगळेकर कॉलेज,रत्नागिरी द्वितीय क्रमांक,कणकवली कॉलेज, कणकवली तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटातडी.बी.जे.कॉलेज, चिपळूण प्रथम क्रमांक,कणकवली कॉलेज, कणकवली द्वितीय क्रमांक व ज्ञानदीप कॉलेज, खेड तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंनी आणि महाविद्यालयांनी दाखवलेल्या खेलवृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर व सचिव विजयकुमार वळंजू व विश्वस्त अनिल डेगवेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनाचे सूत्रसंचालन प्रा.आदिती मालपेकर यांनी केले, तर स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. प्रवीण कडूकर यांनी मानले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, महाविद्यालयातील जिमखाना विभागातील सर्व सदस्य व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












