चि. सर्वेश राजन तेलींच्या शाही लग्न स्वागतसोहळ्याला विधानपरिषद  सभापती उपसभापती, दिग्गज मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आमदार आणि जेष्ठ नेत्यांची लाभणार उपस्थिती

पॅलेस थीम वरील ऐश्वर्यसंपन्न डेकोरेशन ठरतेय लक्षवेधी

कणकवली (प्रतिनिधी) :  शिवसेना नेते माजी आमदार राजन तेली यांचे सुपुत्र चार्टर्ड अकाऊंटंट चिरंजीव सर्वेश आणि चि. सौ.कां. रिमा यांच्या लग्नसोहळा स्वागत समारंभाला विधानपरिषद सभापती उपसभापती तसेच राज्याच्या मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांसह विविध पक्षाचे जेष्ठ नेते आणि आमदारांची उपस्थिती लाभणार आहे. माजी आमदार राजन तेली यांचा सुपुत्र चार्टर्ड अकाऊंटंट चि. सर्वेश आणि चि. सौ. कां. रिमा यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला. या शुभविवावाहनिमित्त भव्य शाही स्वागतसमारंभ कणकवली येथील माजी आमदार राजन तेली यांच्या नंदिश बंगल्याशेजारील मैदानात रविवार 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या स्वागतसोहळ्याला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती सचिन अहिर, महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे, उद्योगमंत्री नामदार डॉ उदय सामंत, रोजगार हमीयोजना तथा रायगडचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच माजी  काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे आमदार निलेश राणे, ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव, आमदार अर्जुन खोतकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  शेखर निकम, आमदार किरण उर्फ भैया सामंत,आमदार  निरंजन डावखरे,  माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार सुरेश नवले, माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार गणपत कदम,माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण आदींची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. माजी आमदार राजन तेली यांचे चिरंजीव सर्वेश यांच्या लग्नसोहळ्याच्या शाही स्वागत सोहळ्यानिमित्त पॅलेस थीम वर अत्यंत आकर्षक डेकोरेशन करण्यात आले असून लक्षवेधी ठरत आहे. रात्री सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असून ऐश्वर्यसंपन्न मंडप पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत आहे.

error: Content is protected !!