मत्स्यखवय्यांच्या जिभेचे चोचले पॉलसी सी फूड्स ने पुरवले – संदेश पारकर

कणकवलीत ‘पॉलसी सीफूड्स’चा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील मासळीप्रेमी तसेच हॉटेल व्यावसायिकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘पॉलसी सीफूड्स’च्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्याचा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. यावेळी शहरातील ज्येष्ठ व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, मान्यवर आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०२१ मध्ये कणकवली शहरात सुरू झालेल्या पॉलसी सीफूड्सने अल्पावधीतच आपल्या व्यवसायाचा विस्तार करत ग्राहकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. फ्रेश फिश तसेच फ्रोजन फिशच्या माध्यमातून विविध प्रकारची मासळी माफक दरात उपलब्ध करून देण्यावर या संस्थेने विशेष भर दिला आहे. केवळ हॉटेल व्यावसायिकांनाच नव्हे, तर वैयक्तिक ग्राहकांनाही त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार मासळी उपलब्ध करून देत पॉलसी सीफूड्सने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बारमाही मासळी मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणून पॉलसी सी फूड्स ची अल्पावधीत ओळख निर्माण झाली आहे.

कणकवली शहर आणि परिसरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेली मासळी वेळेत आणि माफक दरात उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांनाही मासळी खरेदीचा चांगला पर्याय उपलब्ध करून देण्यात पॉलसी सीफूड्स यशस्वी ठरले आहे. ग्राहकांची आवड, बाजारपेठेतील मागणी आणि गुणवत्तेला प्राधान्य देत सुरू असलेली ही पाच वर्षांची वाटचाल निश्चितच कौतुकास्पद आहे.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पॉलसी सीफूड्सच्या वाटचालीचे कौतुक केले. ते म्हणाले की, अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत पॉलसी सीफूड्सने कणकवलीत आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे विस्तारला आहे. फ्रेश फिश आणि फ्रोजन फिश माफक दरात हॉटेल व्यावसायिकांसह वैयक्तिक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेने केले आहे. मच्छी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यात पॉलसी सीफूड्स कणकवलीत यशस्वी ठरले असून, ग्राहकांचा विश्वास संपादन करणे हीच त्यांच्या व्यवसायाची मोठी जमेची बाजू असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी पॉलसी सीफूड्सचे संचालक अपूर्व फर्नांडिस, कणकवली शहरातील ज्येष्ठ व्यापारी सुभाष गोवेकर, ज्येष्ठ विधिज्ञ उमेश सावंत, अप्पर डेक हॉटेल मालक संदीप नलावडे, रिलॅक्स हॉटेलचे विशाल काळसेकर, कालवण हॉटेल चे चिंदरकर तसेच हॉटेल व्यावसायिक मिशाळ, निखिल हॉटेल चे शंकरदास तसेच अन्य हॉटेल व्यावसायिक, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर जाधव यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि पॉलसी सीफूड्सचे ग्राहक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हॉटेल व्यावसायिक तसेच ग्राहकांना पॉलसी सी फूड्स च्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.

पाच वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर पॉलसी सीफूड्सने कणकवलीच्या बाजारपेठेत निर्माण केलेली ओळख आणि ग्राहकांचा मिळवलेला विश्वास ही त्यांच्या पुढील व्यावसायिक प्रगतीची महत्त्वपूर्ण पायाभरणी ठरणार आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!