हुंबरठ ग्रा पं च्या वतीने अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी ) : ग्रामपंचायत हुंबरठ येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली . पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सन्मान पुरस्कार 2023 चे वितरण गावातील श्रीमती पार्वती महादेव दळवी व श्रीमती चंद्री म्हातारा निकम यांना करण्यात आले.प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच श्रीमती मनीषा मनोहर गुरव, उपसरपंच श्री संदीप राजाराम होळकर, ग्रा पं सदस्य श्री नितीन हरिश्चंद्र बागवे, सदस्य सुचिता सुहास दळवी, सौ.रिया राजेंद्र पांचाळ, ग्रामसेवक श्री. वैभव वसंत ठाकूर, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका व महिला बचत गटातील महिला उपस्थित सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!