कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात आज दुपारी पूर्ववैमनस्यातून तिघांनी पाठलाग करून प्रकाश बोडके (वय २४,फुलेवाडी) याच्यावर तलवारीने प्राण घातक हल्ला केला. यावेळी जखमी बोडके याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत येथील तरुणांमध्ये काही दिवसापासून संघर्ष चालू आहे. त्यातून आज पूर्ववैमनस्यातून शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात प्रकाश बोडके याच्यावर तिघांनी हल्ला केला. बोडके जीव वाचवण्यासाठी धावत एका दुकानात शिरला तर दुकानात शिरलेल्या बोडकेला बाहेर काढून त्याच्यावर तलवारीने सपासप वार करून हल्लेखोर फरार झाले.जखमीला परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असून, हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहेत.तसेच फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.












