समाजसेवेचा पाईक..राणेंचा निष्ठावान कार्यकर्ता अरीफभाई !
अरीफ बगदादी वाढदिवस विशेष !
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): अरीफभाई जैनुद्दीन बगदादी ..राजकारणातील सोज्वळ माणूस आणि सेवाभावी वृत्तीने समाजसेवा करणारा राणे कुटुंबीयांचा निष्ठावान कार्यकर्ता ! अरीफभाई बगदादी म्हटलं की नजरेसमोर येतो नेहमीच स्मितहास्याने बोलणारा चेहरा.राजकारणात असूनही समाजसेवेचा कौटुंबिक वसा जोपासून सर्वधर्मसमभाव जपणारा कार्यकर्ता म्हणजे अरीफभाई . आज भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस असणारे अरिफभाई हे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांचे निष्ठावान कार्यकर्ताआहेत. घरातच राजकारणाचे आणि त्यासोबतच सामाजिक कार्याचे बाळकडू मिळालेल्या अरीफभाई यांनी वयाच्या ऐन विशीतच युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपली राजकीय वाटचाल सुरू केली. तत्कालीन युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आणि नंतर देवगड तालुका युवक काँग्रेसचे चे तालुकाध्यक्षपदही त्यांनी भूषविले.त्याकाळी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता हा समाजभान जागृत करणारी विविध प्रशिक्षणे, प्रबोधन शिबीर आदींच्या माध्यमातून वैचारिक बैठक पक्की झालेला असायचा.अरीफभाई युवक काँग्रेसच्या याच मुशीतून तयार झालेले व्यक्तीमत्व.वयाच्या अवघ्या पंचविशीत देवगड पं स चे उपाध्यक्ष आणि नंतर सिंधुदुर्ग जि. प. चे उपाध्यक्ष होण्याचा बहुमान अरीफभाई ना मिळाला. पुरळ जि प मतदारसंघातून त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक साडे सहा हजारहून अधिक मताधिक्क्य मिळवून अरीफभाई विजयी झाले होते. केवळ राजकारण नाही तर समाजकारणातही अरीफभाई हे नाव आघाडीवर आहे. विजयदुर्ग खाडी पट्ट्यासह दशक्रोशीतील गोरगरीब जनतेचा आधारवड म्हणून अरीफभाईंकडे पाहिले जाते. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून आजवर अनेक गरजू गोरगरीब रुग्णांना मदतिचा हात अरीफभाई यांनी दिला आहे. आमदार नितेश राणेंच्या सहकार्यातून आर्थिक स्थिती हालाखीची असलेल्या कॅन्सर ग्रस्त 22 हुन अधिक गरजू रुग्णांवर, 12 हुन अधिक बायपास सर्जरी, कंबरेच्या मणक्यांवर, ब्रेन ट्युमर, मणक्यातुन वाकडी असलेल्या लहान मुलांवर, मुंबईत मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार अरीफभाईंनी केले आहेत. यासाठी मुंबईत जाहिद खान यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.या रुग्णांना मुंबईत ये जा करण्यासाठी प्रसंगी प्रवासखर्चाही अरीफभाई यांनी स्वतःच्या खिशातून केला आहे. असे शेकडो रुग्ण त्यांचे कुटुंबीय आज अरीफभाईंना मसीहा मानतात.सर्वधर्मसमभाव ची शिकवण आणि रुजवण मनात वसलेल्या अरीफभाईंच्या घराचे दरवाजे सर्वांसाठी नेहमी खुले असतात. प्रसिद्ध आंबा बागायतदार शेतकरी म्हणून आपला पिढीजात व्यवसाय संभाळतानाच देवगड हापूस च्या गोडव्याप्रमाणेच देवगड सह जिल्ह्यावासियांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केलेल्या अरीफभाईंना वाढदिवसाच्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !












