मिठबाव येथिल गजबादेवी मंदिर परिसराचा होणार कायापालट…

आमदार रविंद्र फाटक यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून मंदिर व परिसराच्या विकासाकरिता २५ कोटी रु.चा भरीव निधी मंजुर..!!

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठबाव समुद्रकिनारी वसलेल्या प्राचीन अश्या श्री गजबादेवी मंदिराच्या सर्वांगिण विकासासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या विकासकामांसंदर्भातील बैठकीत गजबादेवी मंदीर परिसराच्या सुशोभिकरणासाठी व पर्यटकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी राज्य शासनाकडून २५ कोटी रुपयाचा भरीव निधी मंजुर करून तो तात्काळ उपलब्ध करून देण्यासंबधीचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला.
मिठबाव गावचे सुपुत्र व शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक हे अनेक दिवस या कामासाठी प्रयत्नशील होते.

१९९७ साली धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा पार पडला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणुन देताच मुख्यमंत्र्यानी दिघे साहेबांचे धर्मप्रेम व त्यांची आठवण अजरामर रहावी तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भर पडुन येथिल पर्यटनास चालना मिळावी यासाठी सदर मंदिरास आवश्यक तेवढा भरीव निधी भविष्यातही उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले.यावेळी समस्त मिठबाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार रविंद्र फाटक यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे विशेष आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यानी मंजुर केलेल्या या निधीतून सागरी सुरक्षा भिंत, मंदीर परिसराचे सुशोभिकरण,बैठक व्यवस्था,मंदीरासाठी जोडणारे रस्ते याव्यतिरिक्त पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार रविंद्र फाटक यांनी दिली.

error: Content is protected !!