श्री शिवाजी विद्यामंदिर काळसेचा एस. एस. सी. निकाल १००%

सलग ९ वर्षे १००% निकालाची परंपरा कायम

९४ . ४० % गुण मिळवत प्रणिता परब प्रथम

चौके ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ चा निकाल १००% लागला आहे. या परिक्षेसाठी प्रशालेतून ३० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १००% लागला. यामध्ये अनुक्रमे
९४. ४० % गुण मिळवून प्रणिता प्रभाकर परब हिने प्रथम क्रमांक , ९४ % गुण मिळवून वेदिका अविनाश नाईक हिने द्वितीय तर ९२ .२० % गुण मिळवून रिया प्रमोद परब हिने तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष सी. ए. हेमंत परब , सचिव केशव सावंत आणि सर्व संचालक तसेच मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर ,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , माजी विद्यार्थी सेवा संस्था अध्यक्ष विनोद गोसावी , सेक्रेटरी संतोष गुराम तसेच पंचक्रोशीतील सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!