16 जुनला हाेणार कुडाळ नविन नगराध्यक्षाची निवड

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून ही निवडणूक प्रक्रिया १६ जूनला होणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. विद्यमान नगराध्यक्ष आफरीन करोल यांचा एक वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, नंतर हे पद रिक्त आहे. प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मंदार शिरसाट यांच्याकडे कार्यभार देणात आला आहे. त्यानंतर आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे त्यासाठी १२ जूनला दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १५ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेता येणार आहे . १६ तारखेला विशेष सभा घेऊन नगराध्यक्ष निवड करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!