अवैध वृक्षतोडी च्या गुन्ह्यातील आरोपी सुदिन आगरवडेकर चा अटकपूर्व जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): खैर झाडांची अवैध तोड करण्याच्या गुन्ह्यात घटनास्थळावरून फरार असलेला आरोपी सुदिन श्रीराम आगरवडेकर ( वय 19, रा. तळवडे, ता.सावंतवाडी ) याचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. याकामी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तीवाद केला.वनविभागाच्या मालकीच्या डेगवे येथील जमिनीतील खैर जातीची अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. ही घटना 17 मे रोजी घडली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.त्यानंतर 18 मी रोजी तोडलेली झाडे नेण्यासाठी दुपारी 3 इसम मोटरसायकल सह घटनास्थळी आले असताना त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला.परंतु आरोपी सुदिन आगरवडेकर व आईर हे पसार झाले तर अन्य आरोपी महेश कुडव याला ताब्यात घेण्यात आले होते. सरकारी वकील देसाई यांनी आरोपी सुदिन च्या अटकपूर्व जामीन अर्जाला हरकत घेताना आरोपी सुदिन हा सराईत गुन्हेगार आहे, गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन सुदिन च्या मालकीचे असून ते वाहन ताब्यात घ्यायचे आहे.आरोपी सुदिन हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे अन्य आरोपींच्या जबाबावरून स्पष्ट होत आहे.गुन्हा रात्रीचा घडला असल्यामुळे तो गंभीर स्वरूपाचा असून पर्यावरणाला हानिकारक आहे.तसेच दाखल गुन्हा हा फॉरेस्ट ऍक्ट नुसार अजामीनपात्र आहे.वकील देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी सुदिन चा अटकपूर्व जामीन फेटाळला.

error: Content is protected !!