रेस्क्यू स्कुबा डायव्हिंग व बोट चालविणे प्रशिक्षणाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यात जल पर्यटनासाठी असलेली मोठी संधी लक्षात घेवून जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जल पर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. हे लक्षात घेवून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुरस्कृत राज्यातील स्थानिक युवकांसाठी कालबद्ध कार्यक्रम अंतर्गत जल पर्यटन आणि जीवरक्षक प्रशिक्षण देण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.
सदरचे प्रशिक्षण हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या IISDA तारकर्ली, ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशिक्षण केंद्रावर होणार आहे. सदर कार्यक्रम अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक युवकांसाठी पुढीलप्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कार्यक्रम नाव – बोट चालविणे आणि जीवरक्षक प्रशिक्षण – आवश्यक प्रशिक्षणार्थी संख्या -५ प्रशिक्षण कालावधी दि. १९ जून २०२३ ते दि. ०३ जुलै २०२३ पर्यंत. बचाव स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण आवश्यक प्रशिक्षणार्थी संख्या -५ प्रशिक्षण कालावधी दि. २३ ऑगस्ट २०२३ ते दि. ०६ सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे.
सदर प्रशिक्षणासाठी निवड निकष पुढीलप्रमाणे असतील १. युवक/युवती १८ ते २५ वर्षे वयोगटातील असावेत.२. त्यांचे वजन किमान ५५ किलो असावे. ३. प्रमाणित डॉक्टरचे स्वास्थ्य प्रमाणपत्र असावे. ४. गेल्या ६ महिन्यात कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी. ५. युवती गर्भवती नसावी. ६. कमीत कमी १ कि.मी. पोहता आले पाहिजे. ७. पाण्यात हाताचा वापर न करता किमान १० मिनिटांसाठी तरंगता आले पाहिजे. ८. वेंगुर्ला, देवगड आणि मालवण तालुक्यातील शासनाच्या ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केलेल्या ‘आपदा मित्र स्वयंसेवकांना सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ९. प्रशिक्षणार्थी युवक हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
तरी वरील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी इच्छुक असलेल्या युवक/युवती यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग च्या ०२३६२- २२८८४७ या क्रमांकावर संपर्क साधून सदर प्रशिक्षणासाठी आपली नाव नोंदणी करावी. तसेच www.mtdc.co या वेब साईट वरून training च्या सदराखाली लिंक वरून ऑनलाईन फॉर्म भरून अर्ज ११ जून २०२३ रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत सादर करावेत. प्रशिक्षणासाठी इच्छुक प्रशिक्षणार्थी यांची निवड चाचणी दि. १३ जून २०२३ रोजी इसदा, (Indian Institute of Scubba Diving) तारकली येथे होईल.
सदर प्रशिक्षण हे निवासी स्वरुपाचे मोफत प्रशिक्षण असून सदर करिता प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण ठिकाणी जाणे व येणे या प्रवासखर्च फक्त स्वतः करावा लागेल. तरी सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक तरुण तरुणीनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग च्या ०२३६२-२२८८४७ या क्रमाकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!