गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

१०,६२,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गची धडक मोहीम

कुडाळ ( अमोल गोसावी ) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आलेल्या धडक कारवाईत आज रविवार दिनांक ११ रोजी सायंकाळी ५: ३० वाजता देवसू येथील देवसू वन विश्रामगृहासमोर विनापरवाना गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूकी वर कारवाई करण्यात आली. यामध्ये अवैध दारू वाहतूक करणारा कृष्णा उर्फ राजन रमेश गुरव ( वय ३७ ) राहणार वसोली शेडगेवाडी तालुका कुडाळ सध्या राहणार माजगाव सावंतवाडी याच्या ताब्यातील ३,६२,२०० /- रुपये किंमतीची गोवा बनावटीचीची दारू आणि ७ लाख रुपये किंमतीची स्कॉर्पियो कार असा एकूण १०,६२,२००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल , अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग नितीन बगाटे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, यशवंत आरमारकर यांनी केली.

error: Content is protected !!