चौके ( अमोल गोसावी ): नुकत्याच दहावी व बारावी परीक्षेत सावरवाड परिसरातील उत्तीर्ण झालेल्या व सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराडमधून प्रथम तीन क्रमांकांनी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे ध्यास फाउंडेशन तर्फे गुलाब पुष्प व स्कुल बॅग देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री व सौ सामंत. श्री पांचाळ, श्री व सौ चव्हाण, श्री व सौ श्वेता दि. ठाकुर (ज्या 6वी ते 12वी च्या सायन्स च्या पुस्तकातून स्टडी ग्रुप कमिटी वर मार्गदर्शन करतात .) तसेच संस्थापक सल्लागार श्री सुरेश दत्ताराम चव्हाण ( निवृत्त पोलीस उपनिरीक्षक) ग्रामपंचायत सदस्य श्री. केसरकर,व सावरवाड येथील तरूण उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी मुलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
23सप्टेंबर 2022 रोजी वराड सावरवाड येथील तरूण मुलांनी श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यास फाउंडेशन ची स्थापना केली. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी या फाउंडेशन ची स्थापना झाली. आपल्या कामाची सुरूवात वराड सावरवाड येथील व्हाळातील गाळ काढण्याचे काम करून सामाजिक कामाची सुरूवात केली. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गुणगौरव करणे शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे. अशी ध्यास फाउंडेशनची उद्दीष्टे आहेत.













