वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला वादळाचा फटका, लाखोंचे नुकसान

कुडाळ ( अमोल गोसावी ) : सिंधुदुर्गात दोन दिवसांपासून पाऊस आणि सोसाट्याच्या वारा सुरू आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास वेताळ बांबर्डे मुस्लिमवाडीला जोरदार वादळाने दणका दिला. जोरदार वादळाने मुस्लिमवाडी येथील राहणारे शाबिर मुजावर यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, पलंग यांचे नुकसान झाले. सदर घटना समजताच वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी आणि उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या वादळामुळे शाबिर मुजावर यांच्या घराचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!