युवासेना संघटकपदी नितेश भोगले व कलमठ शहरप्रमुख पदी धीरज मेस्त्री
जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्त पत्र
कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्राचे युवानेतृत्व, युवासेना प्रमुख मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवली तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक तसेच रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी युवासेना कणकवली तालुका व कलमठ विभागासाठी नवीन नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या.यावेळी युवासेना संघटकपदी नितेश भोगले व कलमठ शहरप्रमुख पदी धीरज मेस्त्री यांना जिल्हाप्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली विधानसभा मध्ये युवासेनेचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. विविध सामाजिक व समाजउपयोगी उपक्रम युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधनसभेत होत असतात. कलमठ हे कणकवली शहरालगत असलेले एक महत्वाचे गाव आहे. शहरालगत असलेल्या गावामध्ये देखील युवासेनेच्या माध्यमातून नवीन नियुक्त्या जाहिर करण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक. तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत. युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके. मुकेश सावंत. शेखर सावंत. संजय सावंत. तुषार गांवकर. संदीप गांवकर. व आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.