सावंतवाडी (प्रतिनिधी): येथील तहसीलदारपदी श्रीधर पाटील यांना आज पासून कायम नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश त्यांना प्राप्त झाले असून आज पासून ते आपला कार्यभार स्वीकारणार आहेत. तर या ठिकाणी कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदार अरुण उंडे यांना आता प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार असल्याचे समजते. मात्र याबाबतचे अद्याप पर्यंत कोणतेही आदेश प्राप्त झाले नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले