डाॅ.वासुदेव तांबे यांचे अधुरे स्वप्न पुरे करणे ही आपली जबाबदारी: फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास परब यांचे प्रतिपादन
कणकवली (प्रतिनिधी): असरोंडी गावचे सुपुत्र, समाजभूषण, सेवाभावी डाॅक्टर वासुदेव तांबे यांच्या अकाली जाण्याने असरोंडी पंचक्रोशीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी स्थापन केलेल्या फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन या ट्रस्टचे अपूर्ण राहिलेले कार्य पुढे न्यायचे असेल तर त्यांनी बाळगलेले वैद्यकीय सेवेचे आणि सामाजिक बांधिलकीचे अधुरे स्वप्न पूर्ण करणे ही आपली पहिली जबाबदारी राहिल असे प्रतिपादन ट्रस्टचे अध्यक्ष विलास परब यांनी केले. फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन या ट्रस्टच्या शुभारंभ प्रसंगी असरोंडी हायस्कूल येथे संपन्न झालेल्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. परब पुढे म्हणाले की,कै.वासुदेव तांबे यांनी मुंबई येथे आपली संपूर्ण हयात वैद्यकीय सेवेत घालवली, एक सेवाभावी डाॅक्टर म्हणून त्यांनी आपली ओळख जनमानसात निर्माण केली होती. हे करत असताना मात्र आपल्या असरोंडी पंचक्रोशीतील जनसामान्य लोकांबद्दल त्यांना कमालीची आस्था आणि प्रेम होते. कोरोना काळात गावी येऊन आपल्या सहकाऱ्यांसह आरोग्य सेवा उत्तमरित्या बजावत असतानाच त्यांनी आपल्या पंचक्रोशीच्या जनतेसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त असे वैद्यकीय केंद्र उभे करावे या उद्देशातून ट्रस्टची स्थापना करण्याची जिद्द बाळगली होती. परंतु त्यांच्या अचानक निधनामुळे हे स्वप्न अधुरेच राहिले. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन असरोंडी पंचक्रोशीच्या विकासासाठी अग्रक्रमाने आरोग्यविषयक वैद्यकीय उपक्रम हाती घेऊन स्मृतिशेष डाॅ. वासुदेेव तांबे यांचे कार्य पुढे नेऊया. या लोकार्पण सोहळ्यात असरोंडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व्ही. के.सावंत, सरचिटणीस प्रकाश सावंत, रेखा वासुदेव तांबे, असरोंडी सरपंच अनंत पोईपकर,उपसरपंच बाळकृष्ण सावंत, असगणी सरपंच साक्षी चव्हाण, कासरल उपसरपंच मनोहर मांडवकर, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुशांत पाटील, अंकुुश तांबे, लवू तांबे तसेेच ट्रस्टचे सरचिटणीस देवेंद्र सावंत, खजिनदार अरुण सावंत, सहसचिव लक्ष्मण जाधव, सहखजिनदार दत्ता सावंत तसेच पोलीस पाटील लवू सावंत आणि पंचक्रोशीतील सर्व गावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि असरोंडी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. कै.डाॅ.वासुदेेव तांबे यांच्या पत्नी रेखा तांबे यांंचे हस्ते फिनिक्स मॅॅनकाईंड फाऊंडेशन या ट्रस्टच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले., ट्रस्टचे अध्यक्ष विलास परब यांनी डाॅ.वासुदेेव तांबे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. इतर सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून ट्रस्टच्या लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभ केला. ट्रस्टचे सरचिटणीस देवेंद्र सावंत यांनी निर्मितीमागची भुमिका स्पष्ट करताना सांगितले की आम्ही डाॅ.तांबे यांच्या वैद्यकीय सेवेची आणि सामाजिक योगदानाची प्रेरणा घेऊन हे फाऊंडेशन असरोंडी पंचक्रोशीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकार्पण करत आहोत, तर ट्रस्टचे खजिनदार अरुण सावंत यांनी आपण या फाऊंडेशनच्या माध्यमातून इथल्या जनतेच्या आरोग्यविषयक सेवेसाठी कटिबद्ध राहून वैद्यकीय सेवेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून ट्रस्टचे कार्य पुढे नेऊया अशी पुढील वाटचाल विशद केली. यावेळी व्ही.के.सावंत, प्रकाश सावंत, अनंत पोईपकर आदी उपस्थित मान्यवरांनी ट्रस्टच्या समाजाभिमुख उपक्रमाला आणि पुढील वाटचालीस आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्यात. या लोकार्पण सोहळ्याचे सूत्रसंचालन देवेंद्र तांबे यांनी केले तर आभार ट्रस्टचे सहसचिव लक्ष्मण जाधव यांनी मानले.