सावंतवाडी (प्रतिनिधी): उभादांडा गिरपवाडी येथील अपुर्ण बंधाऱ्याचे काम तात्काळ मार्गी लागावे, तसेच दांडेली-घोणसेवाडी येथील नदीवर पुल उभारण्यासाठी आवश्यक तो पाठपुरा[वा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राऊत यांना दिले असून लवकरात लवकर काम पुर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावा, तसेच आवश्यक तो निधी तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी याबाबत आपण निश्चितच पाठपुरावा करू, असे आश्वासन राऊत यांनी घारे यांना दिले आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, दर्शना बाबर-देसाई, सागर नाणोसकर आदी उपस्थित होते.