खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेच्या खारेपाटण शिवाजीपेठ येथील नूतन शाखा कार्यालयाचा उद्घाटन समारंभ उद्या दि.१४ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता माजी आमदार प्रमोद जठार व के आर धुळप ,सहायक निबंधक सह. कणकवली यांच्या शुभहस्ते खारेपाटण येथे संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह.पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेचे चेअरमन दिलीप पारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर,माजी जि.प.सदस्य रवींद्र जठार,कणकवली वैश्य समाज अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर, खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रांजल कुबल,खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक वीरेंद्र चिके आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने सकाळी १०.०० वाजता श्री सत्यनारायण महापुजा, सकाळी ११.०० वाजता खारेपाटण नूतन शाखेचे उद्घघाटन,दुपारी २.०० ते रात्री.९.०० पर्यंत तीर्थप्रसाद तसेच सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह. पतसंस्थेच्या खारेपाटण येथील नूतन शाखा कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून खारेपाटण येथील विविध शेत्रातील मान्यवरांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला खारेपाटण दशक्रोषितील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन संस्थेचे चेअरमन दिलीप पारकर यांनी केले आहे.