खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या कुरगवणे पवारवाडी येथील मूळ रहिवासी असलेले ज्ञानेश्वर उर्फ ‘ज्ञानु ‘ श्रीधर पवार वय – ४८ वर्षे यांचे आज दि.१२ जून २०२३ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मुंबई येथे निधन झाले. खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती तथा खारेपाटण तालुका चळवळीचे ते मुंबई येथील समितीचे ते सक्रिय व क्रियाशील कार्यकर्ते होते. ज्ञानेश पवार यांच्या दुःखद निधनाची बातमी खारेपाटण येथे समाजात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच खारेपाटण तालुका कृती समिती कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली,१ मुलगा,१भाऊ व दोन विवाहीत बहिनी असा परिवार आहे.