टोल वसुलीला विरोध; वाहन चालकांनी टोल भरू नये; शिवसेना नेते संदेश पारकर

उद्या टोल वसुली करून दाखवाच;आरपारची लढाई !पारकर पुन्हा आक्रमक!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्गात टोल धाडीच रॅकेट उद्यापासून सक्रिय होणार आहे. त्यामुळे याचा त्रास सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांना सहन करावा लागणार आहे.आणि तशी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने निविदा प्रसिद्ध केली आहे.त्यामुळे उद्या टोल वाहन चालकांनी भरू नये अशी भूमिका शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी घेतली आहे. उद्या होणाऱ्या टोल वसुलीच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांनी ओसरगाव टोल नाक्यावर उद्या सकाळी 10 वाजता एकत्र यायचं आहे. असं आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले आहे. ओसरगाव टोल नाक्यावरून 14 जून पासून टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. गेली पाच वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.आतापर्यंत 80 %रस्ता पूर्ण झाला आहे.झाराप ते खारेपाटण पर्यत रस्त्याचा काही भाग अपूर्ण राहिलेला आहे. या महामार्गासाठी जिल्हा वाशियाने संपूर्ण सहकार्य केले.शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या तसेच काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.जिल्ह्यातील MH07 च्या गाड्यांना टोल माफी मिळावी ही मागणी जिल्हा वाशियानी लावून धरली आहे.टोल वसुलीच्या तारखा हायवे प्राधिकरण दरवेळी देत आहे.या टोल वसुलीला शिवसेना म्हणून कडाडून विरोध आहे.जिल्हा वाशियांना लुटण्याच काम केंद्र सरकारकडून होत आहे .याला वेळीच आळा बसला पाहिजे म्हणूनच MH07 च्या वाहनांना टोल माफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.उद्याचं होणारं आंदोलन हे निखाऱ्यासारख धगधगत असणार आहे. ओसरगाव टोल नाक्यांमुळे जिल्ह्याचं विभाजन होत आहे.या टोलमुळे मालवण,कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांना टोलचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.या टोल बाबत अनेक वेळा खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक सुद्धा वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे.तसेच टोल वसुलीला विरोध करत असताना जिल्हा वाशीयांच सहकार्य देखील महत्वाचं आहे. या टोल वसुलीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.त्यामुळे टोल वसुलीची घाई सत्ताधाऱ्यांना लागलेली आहे.सात ते साडेसात लाख रुपये सरकारला दिवसाला भरायचे आहे.त्या टोल नाक्यांवर अकरा ते साडे अकरा लाख रुपये वसुली होणार आहे.सर्व्हेमध्ये निष्पन्न झालेले आहे .साडे सात लाखानंतर शिल्लक राहणार आहेत साडे चार लाख रुपये त्याचं मोठं वाटप होणार आहे.याचं आर्थिक गणित दडलेलं आहे.म्हणून टोल वसुलीची घाई सत्ताधाऱ्यांना लागलेली आहे.त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये हिम्मत असेल तर सिंधुदुर्ग वाशीयांकडून टोल वसुली करून दाखवाच असा पुन्हा इशारा शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी दिला आहे.

error: Content is protected !!