कलमठ साठी स्वतंत्र वायरमन नियुक्त
ऐन पावसाळ्यात कलमठ वासीयांची विजेच्या खेळखंडोबाची डोकेदुखी होणार कमी
कणकवली (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे व वीज कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांच्या माध्यमातून आज सरपंच संदीप मेस्त्री यांनी सिद्धेश धोत्रे यांचे वायरमन म्हणून नियुक्तीपत्र आणून महावितरण कडे सुपूर्द करून दिले. यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीश भगत व उपव्यवस्थापक मानव संसाधन कणकवली विभाग प्रकाश शिंदे यांच्या उपस्थितीत वायरमन सिद्धेश धुत्रे यांची नियुक्ती करण्यात आली