आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती खा. नारायण राणे संपर्क कार्यालयात साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची 100 वी जयंती खासदार नारायण राणे संपर्क कार्यालय कणकवली येथे भाजपच्या वतीने साजरी करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. यावेळी…

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे विद्यार्थी, पालक मेळावा संपन्न !

मसूरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे NMMS विद्यार्थी व पालक यांचा मेळावा संपन्न झाला. गस्ट ते डिसेंबर ५ महिने Nimms विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग सुरू होते त्याचा समारोप समारंभ करण्यात आला. यावेळी या वर्गाचे प्रमुख मार्गदर्शक…

क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाच्या वतीने गुणगौरव समारंभ !

मसूरे (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याकडे लहानपणापासूनच विविध क्षेत्राचे आकर्षण असते. परंतु त्याच्याकडे जिद्द असणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत मुलांना प्रगतशील होण्यासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाचे अनेक व्यावसायिक व उद्योगशील डिप्लोमा व कोर्सेस आहेत त्याचा विध्यार्थ्यानी फायदा घ्यावा. पालकांनीही…

बेदम चोप …मनसे नेते संतोष शिंगाडेंचा बॅनर ठरतोय लक्षवेधी

कल्याणच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील परप्रांतीयांना इशारा कणकवली (आनंद तांबे) : कल्याण मध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीयाला मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यानी बेदम चोपले होते.जर आमच्या सिंधुदुर्गात कुणी परप्रांतीयांनी कल्याण सारखा प्रकार केला तर त्याला बेदम चोप देऊन जशास तसे उत्तर दिले…

चिंचवली ग्रा.पं.च्या वतीने १५ व्या वित्त आयोग निधीतून

प्रा.आ.केंद्र खारेपाटण व शेर्पे उपकेंद्राला ३० हजार रुपये किमतीची मेडीसीन वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग ग्रामस्तर निधीतून प्रा.आ.केंद्र खारेपाटण व उपकेंद्र शेर्पे या आरोग्य केंद्रांना नुकतेच चिंचवली गावचे सरपंच अशोक…

घराला लागलेल्या आगीत होरपळून एकाचा मृत्यू

चौके येथे मंगळवारी रात्री घडली घटना चौके (प्रतिनिधी) : चौके स्थळकरवाडीतील एका घरातील पडवीला मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने घरात वास्तव्यास असलेले दिपक सखाराम परब (बावकर) वय 55 यांचा अगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. चौके स्थळकरवाडीत राहणारे दिपक…

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा

सांघिक व वैयक्तिक खेळात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कब्बडी,खोखो सह गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक,१०० व २०० मीटर धावणे, रस्सीखेच, रिले, कॅरम, बुद्धीबळ यांसारखे अन्य खेळ…

गोळवण येथे वातानुकूल शववाहिनीचे लोकार्पण!

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील गोळवण- कुमामे- डिकवल ग्रामपंचायत तर्फे १५ व्या विक्त आयोग मधून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वातानुकुलीन शववाहिनीचे लोकार्पण माजी उपसरपंच साबाजी गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. प्रारंभी नंदादीप नाईक यांच्या हस्ते शव वाहिनीचे पूजन करण्यात…

सातरल कासरल शाळेत चोरी ; ४ हजारांची भांडी लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातारल कासरल येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराच्या खोलीच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून ४ हजार ५७५ रुपयांची भांडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय बळीराम सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून…

डंपर ला दुचाकीची मागून धडक ; दोघे जखमी, एक गंभीर

कणकवली (प्रतिनिधी) : धावत्या डंपरला पाठीमागून येणाऱ्या दुचाकीवरून वाहतूक करत असलेले साहित्य लागल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार महेश भास्कर चाळके यांना किरकोळ तर कृष्णा राजाराम कळगुटकर (दोघेही रा. शिवडाव) यांना गंभीर दुखापत झाली. कृष्णा कळगुटकर यांच्यावर कणकवली येथील खासगी…

error: Content is protected !!