क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाच्या वतीने गुणगौरव समारंभ !

मसूरे (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याकडे लहानपणापासूनच विविध क्षेत्राचे आकर्षण असते. परंतु त्याच्याकडे जिद्द असणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत मुलांना प्रगतशील होण्यासाठी राज्य शासनासह केंद्र शासनाचे अनेक व्यावसायिक व उद्योगशील डिप्लोमा व कोर्सेस आहेत त्याचा विध्यार्थ्यानी फायदा घ्यावा. पालकांनीही विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणे हे सध्याच्या परिस्थितीत योग्य नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून जास्त मार्क्स मिळावेत अशी अपेक्षा पालकांनी धरू नये असे प्रतिपादन प्रा. प्रदीप निकम यांनी केले. मुंबईमध्ये क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाच्या मध्य मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी दहावी, बारावी, व पदवीचे विद्यार्थी, व संस्थेचे पदाधिकार अध्यक्ष नंदकुमार घाडीगावकर, समाजाचे अध्यक्ष घनश्याम गावकर, निकम ट्युशन क्लासेसचे संचालक प्रदीप निकम , घाडीगावकर पतपेढीचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर, विकास घाडीगावकर, प्रशांत घाडीगावकर व दर्शना घाडी तसेच पदाधिकारी पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच न शिकता सुद्धा मोबाईल मधली चांगल्या प्रकारची माहिती असते. त्यामुळे लहान विद्यार्थी हा सुद्धा सध्याच्या परिस्थितीत गुरु आहे. असं मत यावेळी रघुवीर वायंगणकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र यशवंत घाडीगावकर यांनी तर दर्शना घाडी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!