कल्याणच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील परप्रांतीयांना इशारा
कणकवली (आनंद तांबे) : कल्याण मध्ये मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीयाला मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यानी बेदम चोपले होते.जर आमच्या सिंधुदुर्गात कुणी परप्रांतीयांनी कल्याण सारखा प्रकार केला तर त्याला बेदम चोप देऊन जशास तसे उत्तर दिले जाईल अशा मजकुराचा बॅनर मनसे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क अध्यक्ष कणकवली विधानसभा तथा मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी कणकवली शहरातील पटवर्धन चौकात लावला आहे.शिंगाडे यांनी लावलेला हा बॅनर कणकवली शहरात सध्या चर्चेचा विषय बनला आहे.व्यवसाय धंद्यानिमित्त कणकवली सह सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय स्थिरावले आहेत. मात्र कल्याण प्रमाणे मराठी माणसाला हात लावाल तर गय करणार नाही असा इशाराच मनसे नेते संतोष शिंगाडे यांनी या बॅनर मधून दिला आहे. मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान सहन करणार नाही असे सांगतानाच अशी घटना घडलीच तर मनसे शी संपर्क साधण्यासाठी या बॅनर वर मोबाईल नंबरही दिले आहेत. त्यामुळे शिंगाडे यांनी पटवर्धन चौकात लावलेला हा बॅनर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून चर्चेचा विषय बनला आहे.













