चिंचवली ग्रा.पं.च्या वतीने १५ व्या वित्त आयोग निधीतून

प्रा.आ.केंद्र खारेपाटण व शेर्पे उपकेंद्राला ३० हजार रुपये किमतीची मेडीसीन वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोग ग्रामस्तर निधीतून प्रा.आ.केंद्र खारेपाटण व उपकेंद्र शेर्पे या आरोग्य केंद्रांना नुकतेच चिंचवली गावचे सरपंच अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते प्रा.आ.केंद्रांना लागणारा प्राथमिक औषध साठा अर्थात मेडीसिनचे वाटप करण्यात आले.

खारेपाटण प्रा.आ.केद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम व डॉ. नीलोफर जमादार व शेर्पे उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी ऋषिकेश माने यांचेकडे नुकताच हा औषध साठा तथा मेडीसिन साहित्य मान्यवरांच्या शुभहस्ते रुग्णांच्या सेवेसाठी सुपूर्द करण्यात आले.या वितरण कार्यक्रम प्रसंगी चिंचवली उपसरपंच राजेश पेडणेकर ग्रा.पं.सदस्य मधुकर बांदिवडेकर,रश्मी पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भालेकर, चिंचवली गावचे ग्रामसेवक गिरीश धुमाळे,खारेपाटण सोसायटीचे व्हॉईस चेअरमन सुरेंद्र कोरगावकर, संचालक मोहन पगारे,तसेच शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,उपसरपंच सिराज मुजावर, पोलीस पाटील विनोद शेलार,शबन मुजावर,कुरगवने सरपंच पप्पू ब्रम्हदंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दरम्यान खारेपाटण प्रा.आ.केंद्र व शेर्पे उपकेंद्र येथे स्वतंत्र रित्या संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. चिंचवली ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगातून आरोग्य केंद्रांना देण्यात आलेल्या अत्यावश्यक औषध साठ्या बद्दल खारेपाटण प्रा.आ.केंद्र व शेर्पे उपकेंद्र यांच्यावतीने चिंचवली ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!