आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

कोलगाव येथील अक्षय साहिल आत्महत्या प्रकरणी प्रशांत पवार याला अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव येथील अक्षय जनार्दन साईल याला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रशांत सुभाष पवार रा. भोमवाडी, कोलगांव याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपुर्व जामिन मंजूर केला आहे. संशयिताच्यावतीने…

सासोली जमीन गैरव्यवहार प्रकरणी संदेश पारकर यांच्या आंदोलनाला आमदार वैभव नाईक यांचा पाठींबा

महसूल विभागाच्या अनागोंदी कारभाराकडे राज्याच्या महसूल सचिवांचे लक्ष वेधणार बेकायदेशीर अकृषिक सनदा रद्द करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी करणार- आमदार वैभव नाईक कणकवली (प्रतिनिधी) : सासोली येथे गुजराती परप्रांतीय धनदांडग्यांच्या कंपनीने तेथील काही ग्रामस्थांच्या सामाईक जमिनी सरकारी यंत्रणांना…

किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कोंडगे गावातील रस्ता कामांची उद्घाटने, भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

कोंडगे गावभेट दौरा आणि बैठकीला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद लांजा (प्रतिनिधी) : सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लांजा तालुक्यातील कोंडगे गावातील गुरव वाडी येथे डोंगरी विकास…

फोंडाघाट- मारुतीवाडीची गणपती विसर्जन मिरवणूक संस्कारक्षम- शिस्तबद्ध आणि लक्षणीय !

पंचक्रोशीत संयोजक मारुतीवाडी मित्र मंडळाचे कौतुक फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशी दिवशी फोंडाघाट पंचक्रोशीतील घरोघरीच्या गणरायांचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. मात्र फोंडाघाट -मारुतीवाडी मधील दिमाखदार, शिस्तबद्ध पारंपारिक पद्धती च्या गणेश विसर्जनाची, सर्वत्र चर्चा असून पंचक्रोशीत- बाजारपेठेत सर्व वाडी वरील ग्रामस्थ,…

आमदार नितेश राणेंनी घेतलेला बोगस प्रवेश शिवसेनेने केला उघड

सांगावे गांवकरवाडीच्या ग्रामस्थांची घरवापसी कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सांगवे-गांवकर वाडी येथे जात आमदार नितेश राणेंनी बोगस प्रवेश केला उघड. गांवकर वाडीतील ग्रामस्थांना वाडीची बैठक आहे असं सांगून एकत्र बोलवण्यात आले होते व…

कणकवली शिवसेना उबाठा नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी रामू विखाळे, खजिनदारपदी विलास गुडेकर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना नवरात्रोत्सव २०२४ आयोजित च्या नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी रामदास विखाळे, तर खजिनदार पदी विलास गुडेकर यांची निवड करण्यात आली. आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच समितीची बैठक घेण्यात आली. यावर्षीही ठाकरे शिवसेनेतर्फे मोठ्या उत्साहात…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष वैद्यकीय कक्षाद्वारे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत येथे विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबीराचा शुभारंभ

आचरा (प्रतिनिधी) : आंबोली ग्रामपंचायत येथे उपमुख्यमंत्री सामुदायिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व भारतीय जनता पार्टी आंबोली मंडलाचे संदीप गावडे हे प्रमुख…

शेर्पे गाव महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री चंद्रकांत कांबळे यांची फेरनिवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावाच्या म.गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा शेर्पे बौद्धवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पांडुरंग कांबळे यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात…

युनेस्कोचे पथक देणार सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्याला भेट

गड किल्ल्यांची स्वच्छता हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य – जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक  विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था,…

शिवप्रेमी शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी किल्ले विजयदुर्ग परिसराची स्वच्छता मोहीम राबवून वाढदिवस केला साजरा 

देवगड (प्रतिनिधी) : विजयदुर्ग किल्यावरती आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून उध्दव सेनेचे नेते अतुल रावराणे यांनी कार्यकर्त्यासमवेत स्वच्छता मोहिम राबवून अनोख्या पध्दतीने आपला वाढदिवस साजरा केला. विजयदुर्ग किल्यावरती ग्रामसकटरने साफसफाई करुन स्वच्छता मोहिम राबविताना उध्दव सेनेचे नेते अतुल रावराणे,तालुका प्रमुख मिलिंद…

error: Content is protected !!