चिंदर सडेवाडी प्रशालेतील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश

दिशांत प्रशांत कांबळी याला गोल्ड मेडल, आयुष अपसिंग वसावे याला सिल्वर मेडल तर मयुरी किरण कांबळी हिला ब्रॉन्झ मेडल

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थांनी रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशनसाठी सहभाग घेतला होता. यातील कलर कॉम्पिटिशन यात प्रविष्ठ झालेल्या इयत्ता दुसरी मधील दिशांत प्रशांत कांबळी याने गोल्ड मेडल मिळवले आहे.

दरम्यान, प्रशालेतील इयत्ता चौथी मधील आयुष अपसिंग वसावे याला सिल्वर मेडल तर इयत्ता तिसरी मधील मयुरी किरण कांबळी हिने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना नॅशनल लेवल चे सहभागी प्रमाणपत्र मिळाले.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थी खंबीर उभा राहिला पाहिजे. विविध स्पर्धेत उतरला पाहिजे. यासाठी शाळा स्तरावरही शासनाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आयोजित होत असतात. तसेच अन्य विविध स्पर्धात सहभागी होऊन त्यांचा अधिक सराव होईल आणि मुलांना अधिक काहीतरी शिकता येईल, मुले स्पर्धेच्या युगासाठी तयार होतील. यासाठी अश्या स्पर्धा निश्चितच विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देताना त्यांचा आत्मविश्वास वाढवाणाऱ्या ठरतात. असे मत मार्गदर्शक शिक्षिका शुभांगी लोकरे -खोत यांनी मांडले.

शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांना अधिक वाव मिळावा शालेय अभ्यासक्रमां व्यतिरिक्त इतर ही परीक्षांना मुलांना प्रविष्ठ होण्याची संधी मिळावी यासाठी अश्या स्पर्धात नेहमीच मुले सहभागी होत असतात. तसेच उल्लेखनीय यश संपादन करतात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, उपाध्यक्ष स्वाती सुर्वे, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड, प्रीती कांबळी, मानसी गोसावी, करिष्मा कानविंदे, स्वरा घागरे, हडकर, वसंती वसावे, सुहासिनी गोसावी, तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!