तनुष चिंदरकर, वैखरी केळकर, कस्तुरी बांदिवडेकर प्रथम….!

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदर आयोजित मनाचे श्लोक पठण स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालय चिंदर आयोजित ‘मनाचे श्लोक पठण’ स्पर्धा जिल्हा परिषद शाळा चिंदर नं 1 येथे मोठया उत्सहात आज पार पडली. या स्पर्धेत अंगणवाडी प्रथम गटात तनुष धोंडी चिंदरकर प्रथम, नेहाली अमित वडर द्वितीय, दक्षता उमेश मुणगेकर हिने तृतीय, तर 1ली ते 2 री दुसऱ्या गटात वैखरी मकरंद केळकर प्रथम, सुजन परेश चव्हाण द्वितीय, विहंग तुषार बेहेरे तृतीय तर तिसऱ्यां 3 री ते 4 थी गटात कस्तुरी मंदार बांदिवडेकर प्रथम, वैष्णवी कल्पेश पडवळ द्वितीय, समर्थ कैलास काळे यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेत चिंदर गावातील बहूसंख्य जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

श्री देवी सरस्वती वाचनालय अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सचिव हेमांगी खोत, खजिनदार सीताराम हडकर, त्रिंबक हायस्कुल माजी मुख्याध्यापक उदय मेहेंदळे, ग्रंथपाल स्वरा पालकर, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांच्या हस्ते प्रारंभी दिपप्रज्वलन झाले.

आपल्या लहान पणी घरात जेष्ठ माणसं रोज हरिपाठ म्हणून घेत असत काळ बदलला असला तरी पालकांनी मुलांना अशा प्रकारची सवय लावावी असा सल्ला यावेळी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांनी तर बालवयात झालेले संस्कार आयुष्य घडविण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास जनता विद्या मंदीर त्रिंबकचे निवृत्त मुख्याध्यापक उदय मेहेंदळे यांनी तर चिंदर गाव हा संस्कृती आणि परंपरा जपणार असून आय पी एस सुब्रमन्य केळकर सारखे विद्यार्थी येथे घडले असून मनाचे श्लोक नित्य पठनाने चांगले संस्कार होण्यास मदत होते असे मार्गदर्शन साहित्यिक बाबू घाडीगांवकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी सहखजिनदार सिद्धेश गोलतकर, गोपाळ चिंदरकर, विवेक परब, मनवा चिंदरकर, हिमाली अमरे, ग्रामपंचायत सदस्य जान्हवी घाडी, मुख्याध्यापक राजेंद्र गाड, गंगाराम पोटघन, निशिगंधा वझे, स्मिता जोशी, सचिन तवटे, उज्ज्वला पवार, महेंद्र कदम, शिवाजी खोत, फाटक मॅडम, कांबळी मॅडम, रोहिणी केळस्कर, सतीश कदम, स्वप्ना चिंदरकर, उमेश मुणगेकर, दुर्वा चिंदरकर, निलेश पावसकर, कल्पेश पडवळ, नीलिमा घाडी, भूषण दत्तदास, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते. परीक्षक म्हणून जनता विद्या मंदिरचे निवृत्त मुख्याध्यापक उदय मेहेंदळे व सचिव हेमांगी खोत यांनी केले तर प्रास्ताविक सचिव हेमांगी खोत, सूत्रसंचालन महेंद्र मांजरेकर तर समरोप रावजी तावडे यांनी केले

error: Content is protected !!