नांदगाव सर्विस रस्त्यालगतच असलेल्या विहिरीमध्ये पडून बैलाचा मृत्यू

सर्विस रस्त्याची उंची वाढल्याने विहिरीचा संरक्षण कठडाच गायब ; संबंधित विभाग लक्ष देईल का ?

नांदगाव (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा प्राथमिक आरोग्य केंद्र सर्विस रस्त्यालगतच असलेल्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची विहिरीमध्ये बैल पडल्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. सदर सर्विस रस्त्याची उंची वाढल्याने विहिरीचा असलेला संरक्षण कठडा व रस्त्यांची उंची समान झाली आहे. तसेच योग्य प्रकारे विहिरी सभोवताली संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. बाजूलाच शेती असल्याने शेतामध्ये चरायला आलेली गुरे सरळ त्या वाटेने येत या विहिरीमध्ये पडतात या विहिरीमध्ये या अगोदर दोन वेळा कुत्रे पडले होते तसेच वासरू आणि बकराही या विहिरीत पडला होता मात्र वासरू व बकरा पडल्याने तातडीने त्याला बाहेर काढल्याने त्या मुक्या जनावरांना जीवदान मिळाले होते. मात्र सदर आजचा बैल पडल्यानंतर कोणास न समजल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तरी संबंधित विभाग सभोवताली संरक्षण कठडा करण्यासाठी तातडीने लक्ष देईल का ? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात होता.

याबाबत लगेच सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता अतुल शिवनिवार यांच्याशी संपर्क साधून याबाबत यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, व पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी हायवे प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधला मात्र काही तासांनंतर त्यांनी केसीसी कंपनीची क्रेन पाठवून त्यांच्या सहाय्याने व नांदगाव येथील ग्रामस्थ लतिफ साटविलकर यांच्या सहकार्याने सदर मृत बैलाला विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहे.यावेळी बरेच नागरिक गोळा झाले होते. नुकसान भरपाई साठी मागणी होत होती. मात्र हायवे प्राधिकरण यांच्याशी काहींनी संपर्क साधला मात्र त्यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, नांदगाव मंडळ अधिकारी जाधव, तलाठी सुदर्शन अलकुटे, पोलीस पाटील वृषाली मोरजकर तसेच उबाठा सेनेचे शाखाप्रमुख राजा म्हसकर व गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते.

error: Content is protected !!