आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

ब्राव्हो सौरभ ! युपीएससी अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळचा सौरभ गवंडे राज्यात अव्वल

कुडाळ (प्रतिनिधी) : भारतातील संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) च्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत कुडाळ अभिनवनगर येथील सौरभ संदीप गवंडे याने घवघवीत यश संपादन केले. महाराष्ट्रात अव्वल येण्याचा बहुमान त्याने पटकावून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या या यशाबद्दल त्याचे सर्व…

मसूरेत शालेय विद्यार्थी गुणगौरव व वह्या वाटप कार्यक्रम !

जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्टचे आयोजन मसुरे(प्रतिनिधी) : मसुरे कावावाडी येथील जयश्री रावजी पेडणेकर सेवा ट्रस्ट यांच्या वतीने पंचक्रोशितील शालेय विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि वह्यावाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इ.१० वी, इ.१२ वी, पदवी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या ६०% वरील…

करूळ घाटातील आधार भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे ; महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आराेप वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात सुरु असलेले आधार भिंतीचे काम इतर कामाप्रमाणेच निकृष्ट दर्जाचे सुरु असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.असा आरोप करीत हे निकृष्ट काम थांबाविण्यात यावे.…

नाधवडे येथील शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे व्हेळकरवाडी येथील रमेश तुकाराम पाष्टे  वय ६४ वर्षे या शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. गोवा बांबूळी येथे उपचारदरम्यान त्यांचा  बुधवारी दिनांक 18 सप्टेंबर मृत्यू झाला.      मयत रमेश पाष्टे हे दिनांक १७ सप्टेंबर रोजी शेतात…

नाडण मधील उबाठाचे बूथ प्रमुख नितीन बाईत यांचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील नाडण मधील बाईत वाडी येथील उबाठाचे बूथ प्रमुख नितीन बाईत यांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासमवेत अनेक उबाठा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. नाडण येथील विकास कामे आमदार नितेश राणे यांच्या…

खारेपाटण व शेर्पे केंद्राच्या वतीने प्रदीप श्रावणकर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण प्राथमिक विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हवूपकरम राबविण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त…

पुस्तकाने मला काय दिले स्पर्धेत स्वरा, पलक प्रथम !

बॅ नाथ पै सेवांगण कट्टाचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा आयोजित कै. भाऊ गुराम पुण्यतिथी निमित्तपुस्तकाने मला काय दिले? या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेत १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. १०० विद्यार्थ्याना अंधश्रद्धा निर्मूलन…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथाश्रम, कातकरी मुलांच्या वसतिगृहाला जीवनावश्यक वस्तू, धान्यवाटप

आर सी ग्रुप सिंधुदुर्ग ने सामाजिक उपक्रमांनी साजरा केला नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी…

नाम.रवींद्र चव्हाण यांचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले वाढदिवशी अभिष्टचिंतन

ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंत यांच्यासह भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले नामदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस त्यांची कर्मभूमी…

सुहास कृष्णकांत आंगणे हे मालवण आंगणेवाडीतील गृहस्थ संविता आश्रमात दाखल

निराधार वयोवृध्द बांधवाला मिळाला संविता आश्रमचा आधार खारेपाटण (प्रतिनिधी) : सुहास कृष्णकांत आंगणे हे वय वर्षेः६५ हे निराधार गृहस्थ नुकतेच स्वतःहून आश्रय आणि संरक्षणासाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल झाले.मुळ मालवणच्या आंगणेवाडीतील असलेले व सद्या रत्नागिरी जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या सुहास आंगणे…

error: Content is protected !!